Anuradha Vipat
महागडे बिअर्ड ऑईल विकत घेण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक बिअर्ड ऑईल बनवू शकता.
घरी बनवलेले तेल सुरक्षित आणि त्याचा दाढीच्या वाढीसाठी नक्कीच फायदा होतो.
जोजोबा ऑइल , गोड बदामाचे तेल, नारळ तेल , व्हिटॅमिन ई कॅप्सूल, एक लहान काचेची बाटली .
बाटलीत जोजोबा ऑइल, गोड बदामाचे तेल आणि नारळ तेल एकत्र करा. त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता लॅव्हेंडर, टी ट्री आणि आवडीनुसार एसेन्शिअल ऑइलचे थेंब टाका.
बाटलीचे झाकण घट्ट लावून ती चांगली हलवून घ्या, जेणेकरून सर्व तेल व्यवस्थित मिसळतील.
आंघोळीनंतर जेव्हा दाढीचे केस थोडे ओलसर असतील, तेव्हा हे तेल लावा
तेलाचे ४-५ थेंब घ्या दोन्ही हातांवर चोळून घ्या आणि दाढी व त्याखालील त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा.