Anuradha Vipat
कांद्यावरील हे काळे डाग 'अस्परगिलस नायजर' नावाच्या बुरशीमुळे होतात.
जर काळे डाग फक्त कांद्याच्या सर्वात बाहेरील सालीवर असतील तर तुम्ही तो कांदा खाऊ शकता.
जर काळे डाग खूप जास्त प्रमाणात असतील, कांदा मऊ पडला असेल त्यातून दुर्गंधी येत असेल तर तो कांदा अजिबात खाऊ नका.
कांद्याला पूर्णपणे शिजवल्यास बुरशीचा धोका कमी होतो.
कांद्यावरील काळे डाग धुता किंवा न धुता वापरणे टाळा.
बुरशीमुळे विषबाधा होण्याचा धोका असतो
ज्या लोकांना बुरशीची अॅलर्जी आहे त्यांनी काळ्या डागांच्या कांद्याचा वापर अजिबात करू नये.