Anuradha Vipat
खोबरेल तेल, बदाम तेल किंवा आवळ्याचे तेल गरम करून त्याने डोक्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून केसांना लावा.
आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावल्याने केस गळणे कमी होते
कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस मऊ होतात, गळती थांबते आणि वाढ चांगली होते.
आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश करा. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
तणावामुळे केस गळू शकतात त्यामुळे तणाव कमी करणे महत्वाचे आहे
कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे कमी होते आणि वाढ चांगली होते.