Mahesh Gaikwad
हाताच्या कोपरांचा काळपटपणा घालविण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
लिंबाच्या रस हा नैसर्गिक ब्लीचिंगचे काम करतो. लिंबाचा रस १० मिनिटे कोपरांवर लावा आणि १० मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये थोडे दूध घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोपऱ्यावर हलक्या हाताने चोळा. यामुळे काळपटपणा कमी होईल.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असून दह्यामुळे त्वचेची आद्रता टिकून राहते. याचे मिश्रण कोपरावर लावल्याने फरक पडतो.
कोरफडीचा गर लावल्याने त्वचा हायड्रेट होते शिवाय कोपऱ्याचा काळपटपणा कमी होतो.
मध आणि लिंबाचे मिश्रण करून कोपरावर स्क्रब केल्यामुळे कोपरावरील मृत त्वचा निघून जाते.
त्वचेला पोषण देण्यासाठी व काळपटपणा कमी करण्यासाठी नारळाच्या तेलाने दररोज मसाज करा.