Anuradha Vipat
डोळ्यांना थंडावा देण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्यात खालील घरगुती उपाय नक्की करा.
काकडीच्या थंड चकत्या १०-१५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते.
कापसाचा बोळा थंड दुधात भिजवून तो डोळ्यांवर ठेवा. दुधामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात.
डोळ्यांसाठी गुलाब पाणी हे उत्तम नैसर्गिक औषध आहे. शुद्ध गुलाब पाण्याचे २-२ थेंब डोळ्यात टाकल्याने जळजळ थांबते.
बटाटा किसून त्याचा रस काढा किंवा बटाट्याच्या चकत्या डोळ्यांवर ठेवा.
वापरलेल्या ग्रीन टी किंवा ब्लॅक टी बॅग्स फ्रीजमध्ये ठेवून थंड करा आणि त्यानंतर डोळ्यांवर ठेवा.
शुद्ध कोरफड जेल डोळ्यांच्या आजूबाजूला लावल्याने उष्णतेमुळे होणारी खाज आणि जळजळ कमी होते.