Anuradha Vipat
उन्हाळ्यात उष्णतेमुळे आपली पचनशक्ती थोडी मंदावते, पण वजन कमी करण्यासाठी हा ऋतू सर्वात उत्तम मानला जातो.
उन्हाळ्यात दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. जेवणापूर्वी अर्धा तास पाणी प्यायल्याने भूक कमी लागते.
उन्हाळ्यात ताक, कोकम सरबत, लिंबू पाणी आणि दही यांचा आहारात समावेश करा.
आहारात टरबूज, खरबूज, काकडी आणि संत्री यांसारखी फळे वाढवा. ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन वाढत नाही.
उन्हाळ्यात रात्रीचे जेवण शक्य तितके हलके असावे. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान ३ तासांचे अंतर ठेवा.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जेव्हा वातावरण थंड असते, तेव्हा वेगाने चालणे किंवा योगासने करा.
स्विमिंग हा उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे.