Deepak Bhandigare
घसा दुखत असल्यास अनेकदा खाता- पिताना आणि बोलताना त्रास होतो
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाणी प्यावे
तज्ज्ञांच्या मते, कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि घशालाही आराम मिळतो
घसा खवखवत असल्यास डॉक्टरांकडून मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो
याशिवाय दिवसातून तुम्ही दोनवेळा ग्रीन टी पिऊ शकता, त्यात अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
तुळशीची पाने घालून बनवलेला चहा घशाला त्वरित आराम देऊन सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो
संध्याकाळी गरम सूप पिल्याने शरीर उबदार राहण्यास मदत होते
बरेच दिवस घसा खवखवत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायला हवेत