Anuradha Vipat
जर तुम्हाला घोरण्याचा त्रास होत असेल तर काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता.
जर तुम्हाला घोरण्याचा त्रास होत असेल तर पाठीवर झोपण्याऐवजी बाजूला किंवा पोटावर झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे जीभ आणि घसा वायुमार्गाला अडथळा निर्माण करत नाही.
जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्यास, घोरण्याची शक्यता वाढते. वजन कमी केल्यास घोरणे कमी होऊ शकते.
सर्दी, ऍलर्जी किंवा इतर कारणांमुळे नाक चोंदले असेल तर ते साफ करण्यासाठी उपाययोजना करा.
कोरड्या हवेमुळे घसा कोरडा होऊन घोरणे वाढू शकते. ह्युमिडिफायर वापरल्यास हवेतील आर्द्रता वाढते आणि घोरणे कमी होते.
पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि घसा कोरडा होत नाही, ज्यामुळे घोरणे कमी होऊ शकते.
मद्यपान आणि धूम्रपान केल्याने घशातील स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे घोरणे वाढते.