Anuradha Vipat
जर तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल आणि शरीरात सतत थकवा जाणवत असेल तर जीवनशैली आणि आहारात बदल करण्याची गरज आहे.
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर जायफळ पावडर टाकून प्या.
झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे तळपायांना खोबरेल तेल किंवा साजूक तुपाने मालिश करा.
अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण दुधासोबत घेतल्याने मानसिक ताण कमी होतो आणि निद्रानाशाचा त्रास दूर होतो.
रोज सकाळी रिकाम्या पोटी ५-६ भिजवलेले बदाम आणि १०-१२ मनुके खा. यामुळे शारीरिक कमजोरी दूर होते.
दुधात २-३ खजूर उकळून ते दूध प्यायल्याने अंगात प्रचंड ताकद येते.
जर वजन कमी असेल आणि अशक्तपणा वाटत असेल, तर दिवसातून दोनदा केळी आणि दूध यांचे सेवन करा.