Anuradha Vipat
मळमळ आणि उलट्या होणे ही अत्यंत अस्वस्थ करणारी समस्या आहे.
अपचन, ॲसिडिटी, फूड पॉइझनिंग, प्रवासातील त्रास किंवा संसर्गामुळे हा त्रास होतो.
लिंबातील सायट्रिक ॲसिड पोटातील ॲसिडिटी शांत करते आणि त्याचा ताजेतवाने सुगंध मळमळ दूर करतो.
अचानक उलट्या सुरू झाल्यास स्वयंपाकघरातील काही सोपे नैसर्गिक उपाय करून पोट त्वरित शांत करता येते.
आल्यामध्ये 'जिंजरॉल' हे मुख्य घटक असते, जे पोटातील स्नायूंना आराम देऊन मळमळ आणि उलट्या थांबवण्याचे काम करते.
जिरे आणि ओवा पचनक्रिया सुधारून अपचनामुळे होणाऱ्या उलट्या आणि पोट फुगणे त्वरित थांबवतात.
पुदिन्याची ताजी पाने पचनसंस्थेला थंड ठेवतात आणि मळमळण्याची भावना कमी करतात.