Anuradha Vipat
वाढते वय, व्यायामाचा अभाव किंवा चुकीची जीवनशैली यांमुळे अनेकांना गुडघेदुखीचा हा त्रास होतो.
जर तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल, तर खालील सोपे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच आराम देऊ शकतात.
मोहरीच्या तेलाने गुडघ्यावर हलक्या हाताने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी होते.
रोज रात्री झोपताना कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने सांधेदुखी कमी होते.
मेथीमधील दाहशामक गुणधर्म गुडघ्यांमधील वेदना कमी करण्यास मदत करतात.
जर गुडघ्याला सूज असेल, तर बर्फाने शेक द्यावा. जर फक्त वेदना असतील, तर कोमट पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा.
आल्याचा रस मधात मिसळून घेतल्याने किंवा आल्याचा चहा प्यायल्याने गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो.