Anuradha Vipat
टाचांच्या वेदनांवर मात करण्यासाठी घरगुती उपाय आणि जीवनशैलीत बदल अत्यंत प्रभावी ठरतात.
टाच दुखीपासून सुटका मिळवण्यासाठी खालील काही खात्रीशीर उपाय आहेत.
दिवसातून ३ ते ४ वेळा १५ मिनिटांसाठी दुखऱ्या जागेवर बर्फाची पिशवी किंवा रुमालात गुंडाळलेला बर्फ ठेवा.
कोमट पाण्यात एप्सम मीठ टाकून त्यात १०-१५ मिनिटे पाय भिजवून ठेवा.
सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरात पायाच्या तळव्यांचे आणि पोटऱ्यांचे स्नायू ताणण्याचे व्यायाम करा.
कोमट तीळ तेल, खोबरेल तेल किंवा आयुर्वेदिक महानारायण तेलाने टाचांची हलक्या हाताने मालिश करा.
कोमट पाण्यात काही थेंब ऍपल सायडर व्हिनेगर टाकून त्यात पाय भिजवल्याने सांधेदुखी आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.