Wasp Sting Treatment : मधमाशी आणि गांधीलमाशी चावल्यास करा हे घरगुती उपचार; सूज होईल कमी

Anuradha Vipat

महत्त्वाचा प्रथमोपचार

मधमाशी किंवा कोणताही कीटक चावल्यास सर्वात आधी नांगी बाहेर काढणे आणि प्रभावित जागेवर बर्फ लावणे हा पहिला आणि महत्त्वाचा प्रथमोपचार आहे.

Wasp Sting Treatment | agrowon

नांगी काढा

मधमाशी चावली असल्यास तिची नांगी त्वचेत अडकलेली असते. नखे किंवा क्लीव्हलँड क्लिनिक नुसार एटीएम/क्रेडिट कार्डच्या कडेने ती हळूच खरवडून बाहेर काढा.

Wasp Sting Treatment | agrowon

बर्फ लावा

सुजलेल्या जागेवर कपड्यात गुंडाळलेला बर्फाचा तुकडा १० ते २० मिनिटे ठेवा. यामुळे वेदना आणि जळजळ कमी होते.

Wasp Sting Treatment | Agrowon

बेकिंग सोडा

बेकिंग सोडामध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि चावलेल्या जागेवर १५ मिनिटे लावा. हे कीटकाच्या अम्लीय विषाचा प्रभाव कमी करते.

Wasp Sting Treatment | Agrowon

चुना

घरात उपलब्ध असणाऱ्या चुन्यामध्ये थोडे पाणी मिसळून लावल्यास वेदना लगेच थांबतात.

Wasp Sting Treatment | agrowon

मध

प्रभावित जागेवर थोडे शुद्ध मध चोळा. मधातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जखम लवकर बरी करतात.

Wasp Sting Treatment | agrowon

कोरफड जेल

कोरफडीचा गर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज सुटणे थांबते.

Wasp Sting Treatment | agrowon

Lung Detox Tips : फुफ्फुसे मजबूत आणि स्वच्छ ठेवण्याचे सोपे उपाय

Lung Detox Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...