Gas in Stomach : पोटात होणाऱ्या गॅसवर रामबाण उपाय आहेत हे पेय!

Aslam Abdul Shanedivan

पोटातील गॅस

अनेकांना पोटात गॅस तयार होण्याची समस्या असते. यामुळे पोट, पाठ किंवा डोके दुखणे, ढेकर येणे आणि छातीत आणि पोटात जळजळ होऊ शकते

Gas in Stomach | Agrowon

घरीच बनवलेले पेय

यामुळे गॅसपासून आराम मिळवण्यासाठी घरीच बनवलेले पेय उपाय कारक ठरू शकतात

Gas in Stomach | Agrowon

ताक प्या

ताकात लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे पोटातील गॅसपासून आराम मिळतो.

Gas in Stomach | Agrowon

आवळा रस

आवळा पोट थंड ठेवतो. आवळ्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटात गॅस बनण्याची समस्या कमी होते.

Gas in Stomach | Agrowon

भाजलेले जिरे पाण्यासोबत प्या

जिरे पचनाच्या समस्या दूर करतात. हे ऍसिड न्यूट्रलायझर म्हणून ओळखले जाते. यामुळे पोटदुखीसह गॅसपासून आराम मिळतो.

Gas in Stomach | Agrowon

दालचिनी चहा

दालचिनी पचन सुधारण्यास आणि पोट शांत ठेवण्यास मदत करते. यामुळे सकाळी दालचिनीचा चहा प्या.

Gas in Stomach | Agrowon

गरम पाणी

काही वेळा चुकीचे खाल्ल्यानेही पोटात गॅस होतो. अशा वेळी कोमट पाण्यात हिंग आणि चिमूटभर काळे मीठ टाकून पिल्यास काहीच मिनिटात आराम मिळेल.

Gas in Stomach | Agrowon

Lonar Lake : लोणार सरोवराच्या गुलाबी पाण्याने बदलला रंग?