Anuradha Vipat
प्रत्येकाच्या घरात काही छोट्या-मोठ्या समस्या नेहमीच उद्भवतात. अशा वेळी काही सोपे 'सुपर जुगाड' माहित असल्यास काम खूप सोपे होते.
लसणाची पाकळी गरम पाण्यात २ मिनिटे भिजवा साल लगेच निघेल.
कांदा चिरण्यापूर्वी १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा डोळ्यात पाणी येणार नाही.
गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळून सिंकच्या पाईपमध्ये ओतल्यास चोक-अप निघतो.
फ्रीज, शू रॅक किंवा कपाटातील दुर्गंधी घालवण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा ठेवा वास शोषला जाईल.
रात्री झोपताना किंवा घरात नसताना मोबाईल चार्जर प्लगमध्ये तसाच ठेवू नका वीज वाया जाते.
नखे कापल्यावर खडबडीत असल्यास टूथब्रशने घासून घ्या, ते गुळगुळीत होतील.