Anuradha Vipat
वजन वाढवण्यासाठी आहारात योग्य बदल आणि जीवनशैलीत काही सोप्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.
आहारात कॅलरीज आणि प्रथिने वाढवणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.
हाय फॅट आणि क्रिम असणारे दही तुमचं वजन वाढवण्यासाठी मदत करु शकतात. फुल फॅट असणाऱ्या दहीत प्रोटिन, कार्बोहायड्रेट आणि फॅट सारख्या पोषक तत्त्वांची मात्रा मोठ्याप्रमाणात आढळून येते.
बटाटा खाल्ल्याने वजन वाढते हे सर्वांना माहीत आहेच. परंतु बटाट्याबरोबर तुम्ही स्टार्च घेतल्यास तुमच्या शरीराला आणखी एक्स्ट्रा कॅलरी मिळतील, जी तुमचं वजन वाढवण्यास मदत करु शकतात.
मध वजनाचा समतोल साधतो. जर तुम्ही ओवरवेट असाल तर ते तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करतं आणि जर तुमचं वजन कमी असेल तर वजन वाढवण्यासाठी मदत करतं.
सकाळी-सकाळी सुका मेवा किसून गरम दुधात घालून पिल्याने वजन वाढते. यासाठी खास बदाम, खजूर आणि अंजीरबरोबर गरम दूध पिल्याने जास्त फायदा होतो.
तुम्ही वजन वाढवण्यासाठी डेअरी पदार्थांचा उपयोग केला पाहिजे. दूध, दही, लोणी आणि पनीरसारख्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केल्यास त्याचा फायदा होतो.