Anuradha Vipat
आज तिरंगा आपल्या भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे.
२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने अधिकृतपणे आपल्या भारताच्या तिरंग्याचा स्वीकार केला
१९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय ध्वजाचा प्रस्ताव दिला होता
सुरुवातीला तिरंग्यात लाल हिंदूंसाठी आणि हिरवा मुस्लिमांसाठी रंग होता व चरखा होता.
त्यानंतर महात्मा गांधींनी पांढरा पट्टा आणि चरखा जोडण्याची शिफारस केली
त्यानतंर २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा स्वीकारला. ज्यात केशरी , पांढरा आणि हिरवा असे तीन समान पट्टे आहेत व पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे ज्यामध्ये २४ आरे आहेत.
केशरी रंग त्याग आणि बलिदान, पांढरा रंग सत्य आणि शांती, तर हिरवा रंग समृद्धी आणि सुपीकतेचे प्रतीक तर अशोकचक्र हे कायद्याचे आणि धर्माचे प्रतीक आहे.