Anuradha Vipat
हिंग आणि ओवा यांचे मिश्रण पोटातील गॅस, अपचन आणि फुगारा या समस्यांवर आयुर्वेदिक तोडगा आहे.
आयुर्वेदानुसार हिंग आणि ओवा हे दोन्ही घटक 'दीपन' आणि 'पाचन' गुणांनी समृद्ध आहेत.
चुकीच्या खाण्यापिण्यामुळे किंवा अपचनामुळे पोटात गॅस होणे आणि पोट फुगणे या अत्यंत त्रासदायक समस्या आहेत.
ओव्यामध्ये 'थायमॉल'नावाचे तेल असते, जे गॅस्ट्रिक ज्यूस बाहेर टाकण्यास मदत करते. तर हिंग हे निसर्गाने अँटी-फ्लॅट्युलंट आहे, जे पोटातील वायू लगेच बाहेर काढते.
हे मिश्रण खाल्ल्याने लाळ आणि पाचक रसांची निर्मिती वाढते, ज्यामुळे जड किंवा तेलकट अन्न देखील सहज पचते.
हिंग आणि ओव्यामध्ये अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म असतात, जे पोटातील स्नायूंचे आकुंचन कमी करून पोटदुखी थांबवतात.
जर लहान मुलांच्या पोटात गॅस झाला असेल, तर १ चिमूटभर हिंग कोमट पाण्यात किंवा तेलात मिक्स करून पेस्ट बनवा.ही पेस्ट मुलांच्या बेंबीच्या आजूबाजूला गोल फिरवून लावा.