Anuradha Vipat
मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याची लक्षणे सुरुवातीला अतिशय सौम्य असतात.
रक्तातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त काम करावे लागते, त्यामुळे रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागते.
शरीरातील द्रव पदार्थ लघवीवाटे वारंवार बाहेर पडल्यामुळे तोंडाला कोरड पडते आणि जास्त पाणी पिऊनही तहान भागत नाही.
शरीराला पुरेशी ऊर्जा न मिळाल्याने सतत भूक लागते.
शरीराच्या पेशींना ऊर्जेसाठी पुरेशी साखर न मिळाल्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
कोणतीही डायटिंग किंवा व्यायाम न करता जर अचानक वजन वेगाने कमी होत असेल, तर हे मधुमेहाचे मुख्य लक्षण असू शकते.
रक्तातील उच्च साखरेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. कोणतीही छोटी जखम, कापलेले किंवा फोड बरे होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो.