Anuradha Vipat
सध्याच्या डिजिटल आणि धावपळीच्या युगात रात्री उशिरापर्यंत जागी राहणे किंवा पुरेशी झोप न घेणे ही अनेकांची सवय झाली आहे.
आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनाच्या मते, अपुरी झोप केवळ थकवा आणत नाही, तर ती शरीरात अनेक गंभीर आजारांना जन्म देते.
सलग ६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने हृदयविकाराचा आणि मानसिक आजारांचा धोका ३००% पर्यंत वाढू शकतो.
पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिड वाढणे, विसरभोळेपणा, तीव्र चिंता आणि नैराश्य येण्याचा धोका असतो.
झोप न झाल्याने भूक नियंत्रित करणारे 'लेप्टिन' संप्रेरक कमी होते आणि सतत जंक फूड खाण्याची इच्छा होते, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
झोप पूर्ण झाली नाही तर शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती खालावते आणि माणूस वारंवार आजारी पडतो.
अपुऱ्या झोपेमुळे मेंदूच्या पेशींना विश्रांती मिळत नाही. यामुळे एकाग्रता कमी होणे, निर्णय क्षमता मंदावणे अशा समस्या निर्माण होतात.