Anuradha Vipat
हेल्मेट घालणे हे प्रवासादरम्यान तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
हेल्मेट वापरण्याच्या चुकीच्या सवयी, अस्वच्छता आणि अति घट्ट हेल्मेट यांमुळे तात्पुरती केसगळती किंवा केस तुटण्याची समस्या नक्कीच उद्भवू शकते.
हेल्मेट खूप घट्ट असेल, तर ते वारंवार घालताना आणि काढताना केसांच्या मुळांवर प्रचंड ताण पडतो व केस ओढले जातात. या सततच्या घर्षणामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केस तुटतात .
हेल्मेट घातल्यामुळे डोक्याच्या त्वचेला पुरेशी हवा मिळत नाही . यामुळे भरपूर घाम येतो आणि ओलावा साचून राहतो.
साचलेला घाम आणि अस्वच्छ हेल्मेटमुळे डोक्याच्या त्वचेवर बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन होते, ज्यामुळे प्रचंड कोंडा होतो.
अनेकदा लोक अंघोळ केल्यावर केस पूर्ण न सुकवता लगेच हेल्मेट घालतात. ओले असताना केसांची मुळे खूप नाजूक असतात.
हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्यावर एक स्वच्छ, सुती रुमाल किंवा स्कार्फ बांधा. हा कपडा घाम शोषून घेतो.