Anuradha Vipat
बहीण ही प्रत्येक भावाच्या आयुष्यातील उजेडाची किरण असते, जी आईसारखी माया करते आणि मित्रासारखी सोबत देते.
या रक्षाबंधनाला आपल्या लाडकीला तिचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर संदेश नक्की पाठवा.
माझ्या सुखात आणि दुःखात सावलीसारखी पाठीशी उभी राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
"घर कितीही मोठे असले तरी त्यात बहिणीचे हसू नसेल, तर ते घर अगदी रिकामे वाटते."
"आईनंतर जी आपली सर्वात जास्त काळजी घेते, ती देवमाणूस म्हणजेच 'बहीण' असते."
"नशीबवान असतात ते भाऊ ज्यांच्या आयुष्यात हक्काने रागावणारी आणि तितकाच जीव लावणारी बहीण असते."
"प्रत्येक संकटात आईसारखं पदराखाली घेणाऱ्या माझ्या मोठ्या ताईला मानाचा मुजरा आणि रक्षाबंधाच्या शुभेच्छा!"