Anuradha Vipat
लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची घटना दुर्मिळ असली याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जन्मापासून असलेले हृदयाचे दोष.
कावासाकी आजार हा एक दाहक आजार आहे जो प्रामुख्याने ५ वर्षांखालील मुलांमध्ये दिसून येतो.
कावासाकी आजारामुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर सूज येते, ज्यामुळे रक्ताच्या गाठी होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो
मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे
तासनतास मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यामुळे मुलांमध्ये शारीरिक हालचाल कमी झाली आहे.
जास्त प्रमाणात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेचे पेये घेतल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत