Winter Healthy Drinks : गुलाबी थंडीसाठी बेस्ट पर्याय: चहा-कॉफी सोडून प्या 'ही' पौष्टिक पेये

Anuradha Vipat

आरोग्यासाठी हानिकारक

गुलाबी थंडीच्या दिवसांत शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी आपण सतत चहा किंवा कॉफी पितो, पण त्यांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Winter Healthy Drinks | Agrowon

उबदार पेये

चहा-कॉफीला उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही या हिवाळ्यात ही उबदार पेये नक्की ट्राय करू शकता.

Winter Healthy Drinks | agrowon

हळदीचे दूध

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर हळद, थोडी काळी मिरी पावडर आणि गूळ घालून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शांत झोप लागते.

Winter Healthy Drinks | Agrowon

आले-लिंबू-मधाचा काढा

थंडीच्या दिवसांत घसा खवखवणे किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल, तर हे पेय रामबाण उपाय आहे.

Winter Healthy Drinks | agrowon

गरमागरम टोमॅटो किंवा पालक सूप

टोमॅटो, गाजर, बीट किंवा पालक यांच्या सुपात थोडी काळी मिरी आणि आले घातल्यास ते चविष्ट तर लागतेच, शिवाय शरीराला भरपूर पोषक तत्त्वेही मिळतात.

Winter Healthy Drinks | Agrowon

सुंठ आणि गुळाचे पाणी

आयुर्वेदानुसार हिवाळ्यात सुंठ (वाळलेले आले) आणि गूळ एकत्र करून उकळलेले पाणी पिणे पचनासाठी उत्तम असते.

Winter Healthy Drinks | agrowon

बदाम-केशर दूध

बदाम शरीराला उष्णता आणि शक्ती देतात. रात्री भिजवलेले बदाम वाटून ते दुधात उकळावेत आणि त्यात केशरच्या दोन-तीन काड्या व थोडी वेलची पूड घालावी.

Winter Healthy Drinks | Agrowon

Winter Bucket List : गुलाबी थंडीचा पुरेपूर आनंद घ्या! हिवाळ्यात करण्यासारख्या अविस्मरणीय गोष्टी

Winter Bucket List | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...