Oats Banana Pancakes : नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि न्युट्रिशिअस शुगर-फ्री 'ओट्स केळीचे पॅनकेक'

Anuradha Vipat

अत्यंत सोपी रेसिपी

ओट्स आणि केळीचे पॅनकेक ही एक पूर्णपणे शुगर-फ्री, अंडी न वापरता बनवलेली आणि आरोग्याची काळजी घेणारी अत्यंत सोपी रेसिपी आहे.

Oats Banana Pancakes | agrowon

साहित्य

ओट्सचे पीठ ,पिकलेले केळे,दूध,दही,बेकिंग पावडर,दालचिनी पूड ,तूप किंवा बटर.

Oats Banana Pancakes | agrowon

कृती

एका मोठ्या भांड्यात पिकलेले केळे घेऊन ते काट्या चमच्याने पूर्णपणे मऊ करून घ्या. मॅश केलेल्या केळ्यामध्ये ओट्सचे पीठ, बेकिंग पावडर आणि दालचिनी पूड घालून एकत्र करा.

Oats Banana Pancakes | agrowon

बॅटर तयार करा

आता यात दही आणि थोडे थोडे दूध घालत मिक्स करा. भज्यांच्या पिठापेक्षा थोडे दाटसर पॅनकेकचे बॅटर तयार करून घ्या. हे मिश्रण ५ मिनिटे बाजूला ठेवा.

Oats Banana Pancakes | agrowon

पॅनकेक शेका

नॉन-स्टिक तवा गॅसवर मध्यम आचेवर गरम करा. तव्याला थोडे तूप किंवा बटर लावा.

Oats Banana Pancakes | agrowon

सोनेरी रंगावर भाजा

तव्यावर एक मोठा चमचा बॅटर टाका . मंद आचेवर २ मिनिटे किंवा वरच्या बाजूला बुडबुडे येईपर्यंत शेकू द्या.

Oats Banana Pancakes | agrowon

दुसरी बाजू शेका

आता पॅनकेक काळजीपूर्वक उलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूनेही सोनेरी आणि हलका तांबूस रंग येईपर्यंत शेकून घ्या.तुमचे मऊ आणि चवदार ओट्स केळीचे शुगर-फ्री पॅनकेक खाण्यासाठी तयार आहेत!

Oats Banana Pancakes | agrowon

Gavachi Kheer : आजीच्या हाताच्या चवीची मऊ आणि दाटसर खपली गव्हाची खीर! पाहा रेसिपी

Gavachi Kheer | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...