Gavachi Kheer : आजीच्या हाताच्या चवीची मऊ आणि दाटसर खपली गव्हाची खीर! पाहा रेसिपी

Anuradha Vipat

पारंपारिक पदार्थ

गव्हाची खीर हा महाराष्ट्रातील सण-उत्सवांचा आणि विशेषतः नागपंचमी, गौरी-गणपती किंवा पितृपक्षातील नैवेद्याचा एक मुख्य मानलेला पारंपारिक पदार्थ आहे.

Gavachi Kheer | agrowon

पौष्टिक आणि फायबर

खपली गव्हापासून बनवलेली ही खीर चवीला जितकी अप्रतिम लागते, तितकीच ती आरोग्यासाठी पौष्टिक आणि फायबरने समृद्ध असते.

Gavachi Kheer | agrowon

साहित्य

खपली गहू ,सेंद्रिय गूळ ,ताजे खोबरे,दूध,ड्रायफ्रूट्स,जायफळ आणि वेलची पूड,तूप,मीठ.

Gavachi Kheer | agrowon

पारंपरिक पद्धत

खपली गव्हाला हलका पाण्याचा शिंतोडा मारून मिक्सरवर १-२ वेळा फिरवून घ्या. यानंतर गहू स्वच्छ धुवून रात्रभर किंवा ५ ते ६ तास कोमट पाण्यात भिजत ठेवा. या

Gavachi Kheer | agrowon

गहू मऊ शिजवणे

तूप गरम करा आणि त्यात हा गहू १ मिनिट परतून घ्या. ३ ते ४ कप पाणी आणि एक चिमूटभर मीठ घालून कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या काढून घ्या.

Gavachi Kheer | agrowon

गुळाचा आणि खोबऱ्याचा तडका

त्यात किसलेला गूळ आणि ओल्या खोबऱ्याचे पातळ काप घाला. मंद आचेवर गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ५ मिनिटे शिजवून घ्या. तुपावर काजू, बदाम आणि चारोळी हलकी सोनेरी रंगावर भाजून घ्या. हा कोरडा मेवा आणि उकळलेले घट्ट दूध शिजलेल्या गव्हामध्ये मिक्स करा. सर्व मिश्रण मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगले एकजीव होऊ द्या.

Gavachi Kheer | agrowon

अंतिम टच

खीर तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि वरून जायफळ-वेलची पूड घाला . वरून १ चमचा साजूक तूप सोडा.

Gavachi Kheer | agrowon

Diwali Kurtas For Men : दिवाळी पाडवा आणि भाऊबीजला दिसा एकदम हँडसम; पुरुषांसाठी ट्रेंडी कुर्ता डिझाइन्स

Diwali Kurtas For Men | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...