Vegetable Sandwich Recipe : मेयॉनीजशिवाय बनवा मुलांचा आवडता व्हेजिटेबल सँडविच; चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी भारी

Anuradha Vipat

पर्याय

सँडविच हा मुलांच्या टिफिनसाठी एक उत्तम आणि झटपट होणारा पर्याय आहे.

Vegetable Sandwich Recipe | agrowon

साहित्य

ब्रेड स्लाईस,गाजर ,सिमला मिरची, उकडलेले मक्याचे दाणे, कोथिंबीर, घट्ट दही किंवा किसलेले पनीर, मिरेपूड, चाट मसाला, चवीनुसार मीठ, शुद्ध गाईचे तूप किंवा बटर.

Vegetable Sandwich Recipe | agrowon

कृती

एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेले गाजर, बारीक चिरलेली सिमला मिरची, मका आणि कोथिंबीर एकत्र करा.

Vegetable Sandwich Recipe | agrowon

दही आणि मसाले

या भाज्यांमध्ये घट्ट दही , मिरेपूड, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. ब्रेडच्या दोन स्लाईसवर तयार केलेले भाज्यांचे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या.

Vegetable Sandwich Recipe | agrowon

सँडविच शेकून घ्या

तव्यावर थोडे तूप किंवा बटर लावा. सँडविच तव्यावर ठेवून मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.

Vegetable Sandwich Recipe | agrowon

टिफिनमध्ये पॅक करा

सँडविच त्रिकोणी आकारात मधोमध कापून घ्या. थोडा थंड झाल्यावर टोमॅटो केचअपसोबत मुलांच्या टिफिनमध्ये पॅक करा.

Vegetable Sandwich Recipe | Agrowon

दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा

गव्हाच्या ब्रेडमुळे मुलांना कार्बोहायड्रेट्स मिळतात, ज्यामुळे मुले दिवसभर उत्साही राहतात.

Vegetable Sandwich Recipe | agrowon

Baby Weight : वजनाने बारीक असलेल्या बाळासाठी 'हे'सुपरफूड्स आहेत वरदान; आजच आहारात करा समाविष्ट!

Baby Weight | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...