Anuradha Vipat
हलका आहार म्हणजे सहज पचेल असा आणि कमी कॅलरीज असलेला आहार. यामध्ये भाज्या, फळे, कडधान्ये, आणि पातळ डाळ यांचा समावेश होतो.
रात्री हलका आहार घेतल्यास झोप चांगली लागते. जड आहारामुळे पचनक्रिया मंदावते आणि झोपायला त्रास होतो.
हलका आहारामुळे वजन नियंत्रणात राहते.
हलका आहार पचनासाठी सोपा असल्याने पचनक्रिया सुधारते.
हलका आहार शरीराला आवश्यक ऊर्जा देतो आणि दिवसभर उत्साह टिकवून ठेवतो.
हलके आणि पौष्टिक अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रात्री हलका आहार घेणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे चांगली झोप लागते आणि शरीरही निरोगी राहते.