Jaljeera Recipe : उन्हाळ्यात घरीच तयार करा जलजीरा ; आरोग्यासाठीही फायदेशीर

Mahesh Gaikwad

थंड पेये

उन्हाळ्यात गरमीपासून शरीराला वाचविण्यासाठी घरातल्या घरात अनेक प्रकारची थंड पेये बनवली जातात.

Jaljeera Recipe | Agrowon

लिंबू सरबत

यामध्ये कैरीचं पन्हं, ताक, लस्सी, लिंबू सरबत या सारखी थंड पेये उन्हाच्या झळांपासून शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात.

Jaljeera Recipe | Agrowon

जलजीरा रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असं जलजीरा रेसिपी एकदा ट्राय केलीच पाहिजे.

Jaljeera Recipe | Agrowon

चवदार जलजीरा

जिरे, पुदिना, लिंबू, सोडा यांच्यापासून तयार केलेला जलजीरा चविला अत्यंत चवदार आणि आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर असतो.

Jaljeera Recipe | Agrowon

जिरे पूड

स्वादिष्ट जलजीरा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. यासाठी भाजलेले जिरे, काळे मीठ, आमचूर पावडर, पुदिन्याची पाने, चिरलेली कोथिंबीर,लिंबाचा रस थंडगार पाणी किंवा सोडा हे साहित्य घ्यावे.

Jaljeera Recipe | Agrowon

पुदिना

जलजीरा करताना जिरे, काळे मीठ आणि आमचूर पावडरची मिक्सरमध्ये पूड तयार करावी. अशाच प्रकारे पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर बारीक वाटून त्यात लिंबाचा रस टाकावा.

Jaljeera Recipe | Agrowon

थंडगार जलजीरा

आता तयार झालेली पूड पुदिना कोथिंबीरीचे वाटण एका ग्लासमध्ये टाकून त्यात सोडा किंवा थंड पाणी टाकून सर्व्ह करा.

Jaljeera Recipe | Agrowon
Buttermilk | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....