Gajar Halwa : हिवाळ्यात आवर्जून खा गरम-गरम गाजराचा हलवा; चवीसोबतच मिळतील 'हे' ५ जबरदस्त फायदे!

Anuradha Vipat

'गाजराचा हलवा'

हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरात गरम-गरम आणि खमंग 'गाजराचा हलवा' बनवला जातो.

Gajar Halwa | agrowon

आरोग्यदायी पर्याय

गाजराचा हलवा हा केवळ चवीलाच अप्रतिम नसतो, तर थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता आणि पोषण देण्यासाठी तो एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे.

Gajar Halwa | agrowon

डोळ्यांचे आरोग्य

गाजरामध्ये भरपूर प्रमाणात 'बीटा-कॅरोटीन' आणि 'व्हिटॅमिन ए' असते. थंडीत हलवा खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि रातांधळेपणाचा धोका टळतो.

Gajar Halwa | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

गाजरात व्हिटॅमिन सी असते आणि हलव्यात वापरले जाणारे दूध, ड्रायफ्रुट्स शरीराची इम्युनिटी मजबूत करतात, ज्यामुळे हिवाळ्यातील सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते.

Gajar Halwa | Agrowon

शरीराला अंतर्गत उष्णता

हिवाळ्यात हवेतील थंडीमुळे शरीर आखडते. हलव्यामध्ये असलेले शुद्ध साजूक तूप आणि बदाम-काजू शरीराला आवश्यक उष्णता अन् ऊर्जा देतात.

Gajar Halwa | agrowon

त्वचेवर नैसर्गिक चमक

गाजरा मधील अँटी-ऑक्सिडंट्स हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे त्वचा निस्तेज पडू देत नाहीत आणि त्वचेचा ग्लो टिकवून ठेवतात.

Gajar Halwa | Agrowon

कॅल्शियमचा उत्तम स्रोत

हलव्यामध्ये आटवलेले दूध किंवा खवा वापरल्यामुळे शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

Gajar Halwa | agrowon

Sweet Potato Benefits : वजन कमी करण्यासाठी रताळे कसे खावे? जाणून घ्या चरबी वेगाने विरघळवणारी 'ही' योग्य पद्धत!

Sweet Potato Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...