Anuradha Vipat
चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटी आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात.
आयुर्वेदानुसार आणि आहारशास्त्रानुसार खालील पदार्थ कोणत्या वेळी टाळावेत हे जाणून घेऊयात.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे सर्वात जास्त हानिकारक आहे.
रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने कफ वाढतो आणि घशाचे विकार होऊ शकतो
फळे नेहमी दिवसा किंवा सकाळी खावीत. रात्री उशिरा फळे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते .
रात्री झोपण्यापूर्वी चॉकलेट खाल्ल्याने त्यातील कॅफिनमुळे झोप उडू शकते.
सॅलड किंवा कच्च्या भाज्या रिकाम्या पोटी खाण्याऐवजी जेवणासोबत किंवा जेवणाआधी खाणे चांगले असते.