Mahesh Gaikwad
योग्य आणि संतुलित आहार घेतल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेसह स्मरणशक्तीही सुधारते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे उर्जा मिळते आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
दररोज ४-५ भिजवलेले बदाम खाल्ल्यास मेंदूला आवश्यक पोषण मिळते. तसेच यामध्ये असणाऱ्या व्हिटामिन-सी आणि फायबरमुळे एकाग्रता वाढते.
द्राक्षे, ब्लूबेरी आमि संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणत अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे मेंदूच्या पेशींचे नुकसान टाळते.
डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्होनॉइड्स घटत असतो. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
सॅल्मन आणि सार्डिन या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढते.ॉ
पालक, मेथी आणि ब्रोकलीसारख्या भाज्यांमध्ये व्हिटामिन-के, लोह आणि मॅग्नेशियम असते. यामुळे न्यूरॉन्सचे कार्य बळकट होते.
हळदीमध्ये असणाऱ्या करक्युमिन या घटकामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूत होणारी सूज कमी करण्यासही लाभदायक आहे.ॉ