Healthy Cucumber : पोषक घटकांनी भरपूर आरोग्यदायी काकडी

Team Agrowon

काकडी ही सर्वांत थंड, उत्साहवर्धक आहे. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. ते घातक पदार्थ काढून टाकून शरीराला चांगले ठेवण्यास आणि पोषण करण्यास मदत करते.

Healthy Cucumber | Agrowon

काकडीमध्ये क्युक्युरबिटॅसिन बी हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. हा प्रामुख्याने विविध मानवी कर्करोगाच्या पेशींमध्ये ॲपोप्टोसिस कर्करोगविरोधी क्षमता वाढविण्यास उपयुक्त आहे.

Healthy Cucumber | Agrowon

काकडीची साल आहारातील तंतुमय घटकांचा चांगला स्रोत आहे, जो बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतो.

Healthy Cucumber | Agrowon

पोटातील विषारी घटक काढून टाकून कोलन कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत करतो.

Healthy Cucumber | Agrowon

काकडीमध्ये तंतुमय घटक, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम चांगल्या प्रकारे आढळते. हे पोषक घटक रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.

Healthy Cucumber | Agrowon

पोटॅशिअम आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढविणारे गुणधर्मदेखील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

Healthy Cucumber | Agrowon

त्वचेसाठी काकडी फायदेशीर आहे. काकडीचा रस त्वचेवर लावल्याने फायदा होतो. त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

Healthy Cucumber | Agrowon