Anuradha Vipat
सकाळचा नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार असतो. नाश्ता करताना खालील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.
नाश्त्यामध्ये अंडी, पनीर, मोड आलेली कडधान्ये किंवा मूग डाळीचे धिरडे यांचा समावेश करा.
ओट्स, दलिया किंवा ताजी फळे नाश्त्यात ठेवा. यामुळे पचनक्रिया सुधारते.
झोपेतून उठल्यानंतर १ ते २ तासांच्या आत नाश्ता करणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
घाईघाईत नाश्ता करू नका. अन्नाचा प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाल्ल्याने पचन चांगले होते
नाश्त्यात साखरेचे पदार्थ, पांढरा ब्रेड किंवा बिस्किटे खाणे टाळा.
सकाळी रिकाम्या पोटी चहा-बिस्किटे किंवा खूप तिखट-तळलेले पदार्थ खाणे टाळावे.