Anuradha Vipat
सकाळचा नाश्ता अधिक चविष्ट आणि चटपटीत बनवण्यासाठी 'सॅंडविच' हा एक उत्तम पर्याय आहे.
'सॅंडविच' बनवायला सोपे, चवीला चविष्ट आणि पौष्टिक देखील असते.
बारीक चिरलेली सिमला मिरची, गाजर, स्वीट कॉर्न आणि कोबी यामध्ये मेयोनीज, काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. हे सारण ब्रेडला लावून सॅंडविच टोस्ट करा.
उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्या. त्यावर थोडा चाट मसाला आणि कोथिंबीर टाकून हे मिश्रण ब्रेडमध्ये भरून बटरवर शॅलो फ्राय करा.
ब्रेडला पुदिना आणि कोथिंबिरीची तिखट चटणी लावा. त्यावर काकडी, टोमॅटो, कांदा आणि उकडलेल्या बटाट्याचे काप ठेवा.
पनीरचा चुरा करून त्यात कांदा-टोमॅटो आणि गरम मसाला टाकून भुर्जी बनवून घ्या. हे मिश्रण ब्रेडमध्ये भरून ग्रिल करा.
मुलांना आवडणारे हे सॅंडविच बनवण्यासाठी उकडलेले स्वीट कॉर्न, भरपूर चीज आणि चिली फ्लेक्स वापरा.