Anuradha Vipat
अनेकांना असे वाटते की कोणतीही सवय लावण्यासाठी २१ दिवस पुरेसे असतात. परंतु आधुनिक विज्ञानानुसार हा काळ सर्वांसाठी सारखा नसतो.
एका प्रसिद्ध संशोधनानुसार एखादी नवीन सवय मेंदूला पूर्णपणे अंगवळणी पडण्यासाठी सरासरी ६६ दिवस लागतात .
सवय किती कठीण आहे आणि तुमची इच्छाशक्ती कशी आहे, यावर हा वेळ बदलू शकतो.
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणे ही सवय लागण्यासाठी १८ ते २० दिवस लागतात.
रोज जिममध्ये जाऊन जड व्यायाम करणे ही सवय लागण्यासाठी २५० दिवसांपर्यंतचा काळ लागू शकतो.
सवय लागण्यासाठी लागणारा वेळ व्यक्तीनुसार बदलू शकतो त्यामुळे 'चिकाटी' हाच सर्वात मोठा मंत्र आहे.
नवीन सवय लावण्यासाठी नक्की किती वेळ लागतो यावर अनेक संशोधने झाली आहेत.