Anuradha Vipat
सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी चहा पिण्याऐवजी खालील निरोगी पेयांचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
एका ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू आणि एक चमचा मध मिसळून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
जिरे आणि ओव्याचे पाणी यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास मुळापासून नष्ट होतो.
मेथीचे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा शुद्ध गाईचे तूप मिक्स करून प्या. जुनाट बद्धकोष्ठता दूर होते.
हे पाणी नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते, ज्यामुळे शरीरातील त्रिदोष संतुलित राहतात.
हे आरोग्यदायी पेय प्यायल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटांनी नाश्ता किंवा तुमचा नेहमीचा चहा घ्यावा.