Anuradha Vipat
संध्याकाळच्या चहासोबत किंवा चित्रपट पाहताना बाहेरचे तळलेले आणि प्रिझर्व्हेटिव्हयुक्त वेफर्स खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
या फास्ट फूडला एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय म्हणजे घरीच बेक केलेले कंदमुळांचे चिप्स.
रताळे, बीट, गाजर आणि सुरण यांपासून बनवलेले बेक चिप्स चवीला कुरकुरीत तर लागतातच, शिवाय त्यातून भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वेही मिळतात.
रताळे , बीट ,गाजरे ,ऑलिव्ह ऑईल ,चवीनुसार सैंधव मीठ काळी मिरी पावडर, चाट मसाला किंवा पेरी-पेरी मसाला, ओरेगॅनो किंवा सुकलेली पुदिना पावडर.
रताळे, बीट आणि गाजर स्वच्छ धुवून कोरडे करा. स्लायसरच्या मदतीने यांचे अगदी पातळ आणि एकसारखे काप करून घ्या. कापलेल्या चिप्स एका स्वच्छ सुती कापडावर किंवा किचन टॉवेलवर पसरवून १० मिनिटे कोरडे होऊ द्या.
सर्व काप घ्या. त्यावर ऑलिव्ह ऑईल, मीठ, काळी मिरी पावडर आणि आवडीचे हर्ब्स घालून हलक्या हाताने एकत्र करा. ओव्हन १८०°C वर १० मिनिटे प्री-हीट करा. बेकिंग ट्रेवर बटर पेपर अंथरून त्यावर हे काप एकमेकांवर न ठेवता सुटे-सुटे लावा. १५ ते २० मिनिटे बेक करा.
बेक झाल्यानंतर चिप्स बाहेर काढा. सुरुवातीला ते थोडे मऊ वाटू शकतात, पण ५ ते १० मिनिटे थंड झाल्यावर ते छान कुरकुरीत होतात.