Sanjana Hebbalkar
सण- समारंभ आला किंवा साधा रोजच्या जेवणानंतर आपण डेझर्ट किंवा गोड खात असतो.
आईस्क्रीम, गुलाबजाम, ज्यूस असे अनेक पदार्थ जेवणानंतर आपण खात असतो.
अनेकदा अचानक जेवल्यानंतर किंवा मध्यरात्री गोड खाण्याची इच्छा होते.
याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील डोपामाईन रसायन स्त्रवत आणि गोड खाण्याला उत्तेजित करतं.
पण रात्री जेवल्यानंतर गोड खाण सामान्यता आरोग्यासाठी चांगल नसल्याचं सांगितलं जातं. यामुळे शरीरावर दुरगामी परिणाम होतात.
रात्रीच अन्न पचायला सहसा जड असतं. त्यानंतर गोड खाल्ल्याने त्यातील साखर आणि जास्त कॅलरीजमुळे झोप न येण्यासारखी समस्या उद्भवते
शिवाय गोडामध्ये जास्त कॅलरीज असल्याने हे तुमच्या वजन वाढण्याला कारणीभूत ठरू शकतात.