Sanjana Hebbalkar
हल्ली काजळ घालणं सगळ्यानाच आवडतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मेकअपमध्ये काजळाचा वापर केला जातो.
पूर्वी सणसंमारंभाला वापरलं जाणार काजळ हल्ली रोज महिला डोळ्यात घालतात.
काजळ डोळ्यांच सौंदर्य वाढवतं. त्यामुळे हल्ली सर्रासपणे काजळाचा वापर केला जातो.
मात्र तुम्हाला माहीत आहे का? काजळ वापरणं धोकादायक ठरू शकतं
बाहेरील बनवलेल्या काजळामध्ये वेगवेगळ्या रसायन आणि शिसेचा वापर केला जातो ज्यामुळे डोळे रुक्ष आणि कोरडे होतात
रोज काजळ वापरल्यानं डोळ्यांची अॅलर्जी, कॉर्नियल अल्सर होण्याती शक्यता असते. डोळ्याची जळजळ देखील होते.
त्यामुळे योग्य प्रकारे काजळ निवडा किंवा तुम्ही घरच्या घरी देखील काजळ बनवू शकता जे फायदेशीर ठरेल