Anuradha Vipat
काहीवेळा आपण किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो पण ती शरीरात वाढणाऱ्या मोठ्या आजाराची पूर्वसूचना असू शकतात.
जर तुम्हाला आठवडाभर सतत थकवा जाणवत असेल, तर हे ॲनिमिया , थायरॉईड किंवा मधुमेहाचे लक्षण असू शकते.
जर तुमचे वजन एकाएकी कमी झाले किंवा खूप वाढले, तर ते शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन किंवा गंभीर अंतर्गत आजाराचे संकेत असू शकतात.
छातीत जडपणा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा डाव्या हाताकडे जाणारी कळ ही लक्षणे हृदयविकाराची पूर्वलक्षणे असू शकतात.
नेहमी डोकं जड राहणे आणि त्यासोबत दृष्टी अंधूक होणे हे उच्च रक्तदाब किंवा मायग्रेनचे तीव्र स्वरूप असू शकते.
जर एखादी छोटी जखम किंवा ओरखडा बरा व्हायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
जर खोकला ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकला किंवा आवाजात कायमचा घोगरेपणा आला तर टीबी किंवा घशाचा संसर्ग असू शकतो.