Anuradha Vipat
जर सर्दीमुळे किंवा कफामुळे डोकं जड झालं असेल तर थोडी सुंठ उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा.
१०-१२ तुळशीची पाने, ३-४ काळी मिरी आणि छोटा आल्याचा तुकडा पाण्यात उकळून काढा तयार करा. हा काढा कोमट असताना प्या.
ताणामुळे डोकं जड वाटत असेल तर तेल कोमट करून हाताच्या बोटांनी डोक्याच्या मध्यभागी आणि कपाळावर हलक्या हाताने मसाज करा.
जर झोप पूर्ण न झाल्यामुळे डोकं जड असेल तर जायफळ दुधात किंवा पाण्यात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा.
लवंग थोडी गरम करून ती रुमालात बांधून त्याचा वास घेतल्याने डोक्यातील जडपणा कमी होतो.
एका मोठ्या पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात थोडे ओवा किंवा पुदिन्याचे तेल टाकून त्याची वाफ घ्या.
अनेकदा पित्तामुळे डोकं जड होतं. अशा वेळी ग्लासभर कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते प्यावे.