Anuradha Vipat
नुकतचं एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे की तंबाखू सिगरेटपेक्षाही जास्त धोकादायक आहे. तंबाखूचे सेवन तुमचे आयुष्य उद्धवस्त करु शकते.
तंबाखू चघळण्यामुळे सिगारेटपेक्षा कर्करोगाचा धोका लवकर वाढतो.
संशोधनानुसार तंबाखूमध्ये असलेल्या धोकादायक रसायनांमुळे शरीराच्या पेशींचे अधिक नुकसान होते.
तंबाखू चघळण्यामुळे कर्करोग लवकर आणि आक्रमकपणे तो वाढत जातो.
तंबाखू धूम्रपान न करताही आपले जीवन धुरकट बनवू शकते.
तंबाखू चघळणाऱ्या लोकांना तोंडाचा कर्करोग आणि घशाचा कर्करोग अधिक वेगाने होतो
तंबाखूमुळे कर्करोग तसेच दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि पाचक या समस्या देखील उद्भवतात.