Anuradha Vipat
प्लास्टिकचा अतिवापर आणि त्यातील सूक्ष्म कण आपल्या शरीरात शिरल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
प्लास्टिकमध्ये असणारी BPA आणि Phthalates सारखी रसायने शरीरासाठी अत्यंत घातक आहेत.
प्लास्टिकमधील रसायने शरीरातील हार्मोन्सची नक्कल करतात.
गरम अन्नासाठी प्लास्टिकचा वापर केल्यास त्यातील विषारी घटक अन्नात उतरतात. यामुळे स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो.
प्लास्टिकमधील रसायनांमुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.
संशोधनानुसार, प्लास्टिकमधील काही घटक शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे वजन वाढणे आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो.
रक्तातील मायक्रोप्लास्टिकमुळे शरीराची संसर्गाविरुद्ध लढण्याची शक्ती कमी होऊ शकते