Iodine Deficiency : शरीरात आयोडीन कमी झालं तर कोणते आजार होतात?

Mahesh Gaikwad

गंभीर आजार

आयोडीनची कमीआयोडीन हा थायरॉइड हार्मोम्ससाठी महत्त्वाचा खनिज घटक आहे. शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात.

Iodine Deficiency | Agrowon

थायरॉइड

शरीरात आयोडीनच्या कमीमुळे थायरॉइडची समस्या होऊ शकते. यामध्ये गळ्याच्या भोवती सूज येते. यामुळे गिळताना त्रास होतो.

Iodine Deficiency | Agrowon

गर्भवती महिला

गर्भवती मातेमध्ये आयोडीनची कमतरता असल्यास बाळाच्या मेंदूचा आणि शारीरिक विकासात अडथळा येतो.

Iodine Deficiency | Agrowon

थायरॉइड हार्मोन्स

आयोडीनच्या कमीमुळे थायरॉइड हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात. परिणामी थकवा, वजन वाढणे, कोरडी त्वचा, केस गळणे अशी लक्षणे दिसतात.

Iodine Deficiency | Agrowon

गर्भपात

गर्भवती महिलांमध्ये आयोडीनच्या अभावामुळे गर्भपात, मृतजन्म किंवा बाळाला ऐकण्याचे व बोलण्याचे विकार उद्भवू शकतात.

Iodine Deficiency | Agrowon

बहिरेपणा

आयोडीन कमतरतेमुळे काही मुलांमध्ये बहिरेपणा किंवा तोतरेपणा सारखे दोष निर्माण होतात.

Iodine Deficiency | Agrowon

थकवा वाढतो

शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे स्नायू अशक्त होतात, थकवा वाढतो. तसेच काम करण्याची ऊर्जा कमी होते.

Iodine Deficiency | Agrowon

आयोडीनयुक्त मीठ

शरीरातील आयोडीनची कमी भरून काढण्यासाठी आयोडीनयुक्त मीठ खा. याशिवाय समुद्री मासे, अंडी, दही यांचा आहारात समावेश करा.

Iodine Deficiency | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....