sandeep Shirguppe
सांधेदुखीचा त्रास पावसाळ्यात होत असतो, हवामान बदलले की ते अधिक त्रासदायक होते.
पावसाळ्यात सांधेदुखी दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय प्रभावी ठरतात. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.
ओव्यामध्ये थायमॉल असते. यामुळे सांध्यांची सूज आणि जळजळ कमी होते.
तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक असतात. यामुळे सांध्यांची सूज कमी होते.
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. हे गुडघ्यांचे दुखणे आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.
दालचिनीमध्ये सिनामल्डीहाइड असते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी ही पावडर घरीच तयार करा.
मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, त्याची पेस्ट बनवा ही पेस्ट सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.