sandeep Shirguppe
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे, पावडर, शेक किंवा फॅन्सी डाएट फॉलो करूनही काही उपयोग होत नाही.
परंतु मेथीचे दाणे हे वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. मेथीचे दाणे मेटाबॉलिक रेट वाढवू शकतात.
मेथीच्या दाण्यातून शरीराला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांचे पाणी पिऊ शकता.
मेथीच्या दाण्यांचा चहा शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो, पचनास मदत करतो आणि चयापचय वाढवतो.
चहा बनवण्यासाठी एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी तुळशीच्या पानांसोबत पाण्यात उकळा आणि प्या.
मेथीच्या दाण्याची पावडर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, भूक कमी करण्यास आणि मेटाबॉलिक रेट वाढविण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी मेथी दाणे आणि मधाची पेस्ट देखील खाऊ शकतो.