sandeep Shirguppe
आयुर्वेदीय महत्व असलेल्या शतावरीचे अनेक फायदे आहेत. यामुळे महिलांसह पुरूषांच्या अनेक समस्यांचे निराकारण होते.
शतावरी प्रत्येकासाठी उपयुक्त आहे, मात्र, सर्वाधिक उपयोगी आहे ते महिलांसाठी. आज याच शतावरीचे उपयोग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शतावरीचे सेवन केल्यास मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या दूर होतात.
अनेक महिलांना इच्छा असूनही गर्भधारणा होत नाही. त्यांना शतावरी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
दोन मासिक पाळींमध्ये ओव्ब्युलेशन पिरीयड्सच येत नाही. अशा महिलांना नियमित शतावरीचे सेवन केल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते.
शतावरीचे सेवन केल्यास हार्मोन बॅलेन्स होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील तणाव देखील कमी होतो.
शतावरीमध्ये अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण असते. याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
रात्री झोपण्याच्या दोन तासांपूर्वी शतावरीचे सेवन करा. गरम दुधामध्ये हळदी आणि शतावरी चूर्ण घालू पिऊ शकता.