Deepak Bhandigare
तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या भाकरीत कॅलरीज तुलनेने कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते
तांदळाच्या पिठात भरपूर फायबर असते, यामुळे जर तुम्हाला पोट निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात या भाकरीचा समावेश करु शकता
ज्यांना पचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तांदळाची भाकरी योग्य पर्याय आहे, कारण ती हलकी, ग्लूटेन-मुक्त असते
ही भाकरी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, तसेच आजारातून सावरत असलेले अथवा वारंवार पचनाच्या समस्या असलेल्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे
तांदळाच्या भाकरीत ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि इतर महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात, जी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात
तांदळात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेला आतून पोषण देतात, त्यामुळे तांदळाची भाकरी नियमित खाल्ल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येऊ शकते
तांदळाच्या पिठात कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी यांसारखे पोषक घटक असतात, यामुळे तांदळाची भाकरी आरोग्यदायी मानली जाते
ज्यांना गव्हाची अॅलर्जी आहे, अशा लोकांसाठी आहारात तांदळाची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे