Team Agrowon
कवठ हे फळ मधूर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या सेवनाने रोग प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते
कवठ फळा प्रमाणेच कवठाची पाने देखील बऱ्याच अंशी आजार दूर करण्यासाठी वापरली जातात. कवठ हे अतिशय पौष्टिक व शीतल फळ आहे. त्याच्या सेवनाने रक्ताचे शुद्धीकरण होते.
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी कवठ हे उपयुक्त असे फळ आहे.
कवठामध्ये लोह, तंतुमय पदार्थ, पौष्टिक मूलद्रव्ये, प्रथिने, कर्बोदके, कॅल्शिअम, जीवनसत्त्व ‘क’ पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात.
कवठाच्या पानाचे दही आणि खडीसाखर या बरोबर सेवन केल्याने पित्तापासून आराम मिळतो.
दररोज कवठ खाल्ल्यामुळे कफाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कच्च्या कवठाच्या गराचा रस दररोज प्यायल्यास दमा विकार कमी होण्यास मदत होते.
कवठापासून जॅम, जेली, चटणी, ज्यूस, लोणचे असे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
Methi Cultivation : कमी खर्चात, कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या मेथीची लागवड